बेळगाव : बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना आणि मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ झेंडा चौक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रत्नाकर शेट्टी स्मृती 17 व्या श्रीगणेश जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेतील मानाचा ‘श्री गणेश -2021 किताब’ रॉ फिटनेस जिमच्या तानाजी चौगुले याने पटकाविला आहे.
रामनाथ मंगल कार्यालय येथे काल मंगळवारी रात्री सदर शरीरसौष्ठव स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. भारतीय शरीरसौष्ठव महासंघाच्या (आयबीबीएफ) नियमानुसार 55, 60, 65, 70, 75, 80 आणि 80 किलोवरील अशा सात वजनी गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये 100 हून अधिक शरीर सौष्ठवपटूनी भाग घेतला होता. प्रमुख पाहुणे रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष अशोक नाईक, प्रणव शेट्टी, मोतीचंद दोरकाडी, भूपेंद्र पटेल, अमित किल्लेकर, नितीन हंगिरगेकर, मिलिंद पाटणकर, संग्राम चौगुले आदींच्या हस्ते शरीरसौष्ठव स्पर्धेतील यशस्वी शरीरसौष्ठवपटूंना आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
प्रमुख पाहुणे अशोक नाईक, प्रणव शेट्टी आदींच्या हस्ते श्रीगणेश-2021 किताब विजेत्या तानाजी चौगुले याला टायटल व आकर्षक करंडकासह रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेतील ‘बेस्ट पोझर’ म्हणून पोली हायड्रोजन जिमच्या उमेश गणगणे यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी आशियाई पंच अजित सिद्दण्णावर, मि. इंडिया सुनील आपटेकर, पवन हंगिरगेकर, सचिन हंगिरगेकर, उमा महेश, राजू हंगरगेकर, अनिलकुमार जैन आदी व्यासपिठावर उपस्थित होते. स्पर्धेसाठी पंच म्हणून एम. के. गुरव, गंगाधर एम., प्रकाश पुजारी, हेमंत हावळ, अनंत लंगरकांडे, नूर मुल्ला, सुनिल पवार बसवराज अरळीकट्टी आदींनी काम पाहिले. स्पर्धेतील गटवार पहिल्या पाच क्रमांकाचे विजेते खालीलप्रमाणे आहेत.
55 किलो गट : आकाश निगराणी (पॉली हायड्रॉन), शानूल अंकली, बिट्टू झंगरुचे, अफताब किल्लेदार, प्रशांत यमीतकर. 60 किलो गट : उमेश गणगणे (पॉली हायड्रॉन), दिनेश नाईक, चन्नय्या कलमठ, प्रज्योत चौगुले, नागराज मास्तमर्डी. 65 किलो गट : प्रकाश कांबळे, प्रताप कालकुंद्रीकर, उमेश करई, असिफ मुजावर. 70 किलो गट : तानाजी चौगुले (रॉ फिटनेस जिम), सुनील भातकांडे, राजेंद्र बैलुर, संकेत सुरूतेकर, राहुल हनुमंताचे. 75 किलो गट : सुधीर मन्नोळकर (शिवशाही जिम), नागराज डुलराकोप्प, बसवाणी गुरव, मुफीज मुल्ला, आदित्य यमकनमर्डी. 80 किलो गट : गजानन काकतीकर (पॉली हायड्रॉन), विनय डोणकरी, अजय दंडगलकर, विक्रम गौडर, ओमकार लंगरकांडे. 80 किलो वरील गट : प्रतीक बाळेकुंद्री (रुद्रा जिम), समंत गौडा, महेश गवळी, महादेव दरणावर.
Check Also
येळ्ळूर ग्राम पंचायतच्या भ्रष्टाचारासंबंधी जिल्हा पंचायत सीईओंची घेतली भेट!
Spread the love बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायतमध्ये 2018-19 या आर्थिक वर्षात 14 वा वित्त …