
बेळगाव : नुकत्याच बेंगळूर येथील विकास सौधमध्ये शुक्रवार दि. 08/07/2022 रोजी कर्नाटक राज्यातील 30 जिल्ह्यातील 30 ग्राम पंचयातच्या अध्यक्ष व पिडिओ यांना बेंगळूर येथे बोलावून पुढील पाच वर्षाचा ग्राम पंचायत दूरदृष्टी कृती आरखाडा या योजनेबाबत प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये बेळगाव जिल्ह्यातून एकमेव येळ्ळूर ग्राम पंचायतीचा समावेश आहे. यावेळी एल. के. अतिक एडिशनल चीफ सेक्रेटरी बेंगळूर तसेच शिल्पा वर्मा आयएएस पंचायतराज कमिश्नर यांनी या योजनेसंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच बेळगाव जिल्हा पंचायत उपकार्यदर्शी बसवराज हेगनायक हेही यावेळी उपस्थित होते, तसेच ग्राम पंचायत विकासासंदर्भात येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील व पीडिओ अरुण नाईक यांनी पुढील पाच वर्षाच्या दूरदृष्टी योजनेबद्दल, विकास कामासंदर्भात विचार मंडाले.
Belgaum Varta Belgaum Varta