बेळगाव : इनरव्हील क्लब ऑफ बेळगाव यांच्यातर्फे सोमवारी सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच इतर सुविधा देखील उपलब्ध व्हाव्यात या दृष्टिकोनातून शालेय विद्यार्थ्यांना चप्पलचे वितरण करण्यात आले. ग्रामीण भागातील प्राथमिक शाळेत हा उपक्रम राबविण्यात आला.
गुरुप्रसाद नगर मंडळी येथील सरकारी कन्नड शाळेत हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी इनरव्हील क्लब ऑफ बेळगावच्या सदस्या उपस्थित होत्या. उपक्रमाच्या अध्यक्षा रेवती हत्तरकी यांच्या मार्गद्शनाखाली हा उपक्रम पार पडला.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने विद्यार्थ्यांना घरापासून शाळेत येत असताना समस्यांचा सामना करावा लागतो. अशावेळी चालत येत असताना त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये, या दृष्टिकोनातून चप्पलचे वितरण करण्यात आले शाळेतील एकूण 50 विद्यार्थ्यांना सदर चप्पल देण्यात आल्या. इनरव्हील क्लबतर्फे सातत्याने सामजिक बांधिलकी जपत शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतात तसाच हा एक उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
Belgaum Varta Belgaum Varta