
बेळगाव : पिरनवाडी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे 13 जुलै 2022 रोजी सकाळी 7 वाजता या भागातील समस्त शिवभक्तांतर्फे “पावनखिंडचा रणसंग्राम” अर्थात “बांदल सेना शौर्य दिवस” मानवंदना देऊन गांभीर्याने पाळण्यात येणार आहे.
पावनखिंडीतल्या रणसंग्रामात अतुलनीय शौर्य गाजविलेल्या पराक्रमी वीर शिवा काशिद आणि बाजीप्रभूंना आम्ही आठवण करतो, पण त्याच रणसंग्रामात अतुलनीय शौर्य गाजवून धारातीर्थी पडलेले रायजी बांदल, कोयाजी बांदल आणि 300 अनामिक योद्धे आपणाला माहीत नाहीत. अभिमान, शौर्य, स्वामिनिष्ठा आणि जीवाची कुरवंडी करणारा पराक्रम म्हणजे पावनखिंड खडी फौज शत्रूवर चित्यासारखी तुटून पडणारी आणि क्षणात तासून काडणारी बांदल सेना म्हणजे रक्तात भिनलेले स्वराज्य निष्ठा आणि एकनिष्ठता होय. बांदल सेने आणि त्या अनामिक योध्याबाबत माहिती व्हावी यासाठी हा दिवस पाळला जात आहे. मानवंदना देण्यासाठी मच्छे, पिरनवाडी (चिन्नपट्टण), खादरवाडी (केदारवाडी), किणये, झाडशहापूर व इतर गावातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पुजा
बेळगाव नाभिक समाजाचे प्रमुख श्री महादेव वाघमारे आणि शहापूर नाभिक समाजाचे प्रमुख श्री. संजय भोगुलकर यांच्या हस्ते होणार आहे. तरी शिवभक्तांनी वेळेवर उपस्थित रहावे.
Belgaum Varta Belgaum Varta