Wednesday , March 4 2026
Breaking News

समर्थनगर येथे आढळला घोणस सर्प

Spread the love

 

बेळगाव : समर्थनगर चौथा क्रॉस येथील रहिवासी विनायक कोकितकर यांच्या घराच्या मागील बाजूस 5.9 फूट लांबीचा घोणस जातीचा विषारी साप आढळून आला. कोकितकर यांनी लागलीच सर्पमित्र अक्षय हुंदरे यांना कळविले. अक्षय हुंदरे यांनी शिताफीने साप पकडून मंडोळीच्या डोंगरात सोडून दिले.
यावेळी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सर्पमित्र अक्षय हुंदरे यांनी सांगितले की, पावसामुळे साप निवारा शोधण्यासाठी घरामध्ये शिरत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घराच्या आसपास अडगळ ठेवू नये जर कुठे साप आढळल्यास घाबरून न जाता तात्काळ सर्पमित्रांना पाचारण करून सापांना जीवदान द्या असे आवाहन केले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *