Sunday , July 26 2026
Breaking News

एपीएमसी, रविवार पेठ उद्या बंद

Spread the love

बेळगाव : केंद्र सरकारने धान्य आणि डाळींवर 5 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला आहे. याविरोधात बेळगाव शहरातील धान्य व्यापाऱ्यांनी शनिवारी बंद पुकारला आहे. शनिवारी धान्यांची दुकाने बंद असणार आहेत, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली असून, तसे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. आहार धान्य आणि डाळींवर 5 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय चुकीचा आहे. जीवनोपयोगी साहित्यावर जीएसटी लावण्यात येऊ नये.
डाळी, धान्यांची किंमत अधिक असते. त्यात जीएसटी आकारल्यास किमतीत वाढ होणार असून ते लोकांना त्रासदायक ठरणार आहे. असे व्यापाऱ्यांचे म्हणणे असून, सरकारच्या या निर्णयाविरोधात शनिवारी शहरातील सर्व धान्य बाजारपेठ, दुकाने बंद असणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना देण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *