Saturday , October 19 2024
Breaking News

अंशतः विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा संततधार

Spread the love

 

बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने काल शुक्रवारी काही अंशी विश्रांती घेतली. बऱ्याच दिवसानंतर बेळगाव परिसरातील नागरिकांना सूर्यदर्शनही घडले. मात्र त्यानंतर सायंकाळी अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. रात्रीही दमदार पावसाच्या सरी कोसळल्या. आज शनिवारी सकाळपासूनच पुन्हा एकदा संततधार पावसाने सुरुवात केली आहे. प्रशासनाने पावसामुळे विद्यार्थ्यांना त्रास होऊ यासाठी शुक्रवार आणि शनिवारी सुट्टी जाहीर केली आहे.
पावसाच्या संततधारेमुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले आहे. त्याचबरोबर स्मार्ट सिटी बेळगाव शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा उघड्यावर आली आहे.
पावसाबरोबरच शहर परिसरात झाडे आणि जुनी घरे
कोसळण्याच्या घटना घडत आहेत. बळ्ळारी नाला शेजारील शेत जमीन पाण्याखाली गेली आहे. 500 एकर वरील भात पीक नष्ट झाल्याचे दिसून येत आहे. कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी बेळ्ळारी नाल्याच्या परिसराची पाहणी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *