Monday , September 21 2026
Breaking News

प्राध्यापक डॉ. एन. डी. पाटील यांची जयंती उत्साहात साजरी

Spread the love

 

सौंदलगा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल या शाखेमध्ये प्राध्यापक डॉ. एन. डी. पाटील यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
एन. डी. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन माजी मुख्याध्यापक श्री. एस. डी. पाटील यांच्या हस्ते झाले विद्यालयातील विद्यार्थिनींनी ईशस्तवन गायले.
विद्यालयातील सहाय्यक शिक्षक श्री. एस. व्ही. यादव यांनी कार्यक्रमाचा उद्देश व एन. डी. पाटील यांच्या विषयीची माहिती दिली माजी मुख्याध्यापक व कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते एस. डी. पाटील यांनी एन. डी. पाटील यांच्या सहवासातील अनेक घटना सांगत त्यांच्या कार्याचा आढावा घेतला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री. जे. एस. वाडकर हे होते. त्यांनी अध्यक्षीय भाषणात एन. डी. पाटील यांच्या शैक्षणिक कार्याची माहिती दिली तसेच एन. डी. पाटील हे रयतसाठी किती महत्त्वाचे होते याविषयी सांगितले.
या कार्यक्रमासाठी बी. एम. शिंत्रे, एस. डी. कुंभार, एम. जी. बोरगे, आर. ए. खाडे , पी. पी. भोईटे, ए. एस. तेग्गी, आर. व्ही. शेवाळे यांच्यासह सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. बी. पाटील यांनी तर आभार एस. आर. मुधाळे यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *