बेळगाव : बेळगाव येथील एल्गार सामाजिक साहित्य परिषद यांच्या वतीने बेळगावातील प्रसिद्ध पुस्तकप्रेमी आणि पुस्तक संग्राहक शंकर चाफाडकर यांच्या पाचव्या स्मृतिदिन प्रित्यर्थ वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन रामदेव गल्ली, बेळगाव येथील गिरीश कॉम्प्लेक्शच्या शहीद भगतसिंग सभागृहात रविवार दि. १७ जुलै रोजी मोठ्या उत्साहात पार पडल्या.
वक्तृत्व स्पर्धेच्या उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एल्गार सामाजिक साहित्य परिषदचे अध्यक्ष चंद्रशेखर गायकवाड उपस्थित होते.
शंकर चाफाडकर स्मृती प्रित्यर्थ घेतलेल्या या वक्तृत्व स्पर्धेला परीक्षक म्हणून जेष्ठ साहित्यीक प्रा. सुभाष सुंठणकर आणि प्रा. संजय बंड उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. निलेश शिंदे यांनी केले. यावेळी चंद्रशेखर गायकवाड यांनी परिसरातील विविध महाविद्यालयातून आलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी श्री. देवदत्त पेडणेकर, अर्जुन सांगावकर, शिवाजी शिंदे, प्रा. अशोक आलगोंडी यांच्यासह विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
सूत्रसंचालन सागर मरगाणाचे यांनी केले.