बेळगाव : अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर खोटे आरोप करून समन्स पाठविण्याचे काम केंद्रातील भाजप सरकारने चालविली असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हा स्थळांवर शुक्रवारी 22 जुलै रोजी निषेध मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 22 जुलै रोजी सकाळी ठीक 11 वाजता काँग्रेस भवनापासून मोर्चाला प्रारंभ होणार आहे. काँग्रेस नेत्यांनी आणि पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष विनय नावळगट्टी यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta