Monday , April 20 2026
Breaking News

वडगाव येथे वानराचा दुर्दैवी मृत्यू

Spread the love

बेळगाव : सिमेंटच्या जंगलात बागडणार्‍या वानराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना वडगाव येथे घडली आहे. उंच इमारतीच्यामध्ये या इमारतीवरून त्या इमारतींवर उडी मारत असताना डोक्याला मार लागल्यामुळे एका वानराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. परिसरातील नागरिकांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी तात्काळ या भागातील लोकप्रतिनिधी शिल्पा कुंभार यांना कळविले. त्यांनी आपल्या सहकार्‍यांना या घटनेची कल्पना देत अंत्यविधी करण्याची सूचना केली. दरम्यान वॉर्ड क्रमांक 28 चे निरिक्षक संजय पाटील यांना ही घटना समजताच तात्काळ त्यांनी घटनास्थळी भेट दिली व आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने मृत वानराला खाली काढले.
त्यानंतर हिंदू रिवाजाप्रमाणे संजय पाटील, राजू शिगोली, व मलेश संकन्नावर यांनी वडगाव येथे या वानराचा अंत्यविधी केला.
वाढत्या जंगलतोडीमुळे प्राणी, पक्षी शहराकडे धाव घेत आहेत. मात्र या सिमेंटच्या जंगलात मुक्या जीवाना मोकळा श्वास घेणे अवघड झाले आहे. हल्ली टोलेजंग इमारतींची संख्या खूप वाढली आहे. अन्नाच्या शोधात माकडे मानवी वस्तीत शिरतात व या इमारतींवर त्या इमारतींवर झेप घेत असतात. इमारतीजवळून जाणार्‍या विद्युत वहिनीच्या स्पर्शाने वानराचा बळी जाण्याच्या घटनेत देखील वाढ झाली आहे. त्या घटनांची दाखल घेऊन प्रशासनाने अश्या मुक्या जनावरांसाठी एखादी योजना आखणे गरजेचे आहे तसेच मानवी वसाहतीत वावरणार्‍या वानराना पकडून जंगलात सोडून देण्याची गरज आहे, असे मत निरिक्षक संजय पाटील यांनी व्यक्त केले.

About Belgaum Varta

Check Also

चित्ररथ मिरवणुकीस नरगुंदकर भावे चौकातून सुरुवात

Spread the love  बेळगाव : मंगळवार दि. २१ एप्रिल २०२६ रोजी शहराच्या ऐतिहासीक परंपरेनुसार सायंकाळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *