
बेळगाव : आज 21 जुलै हुतात्मा रयत दिनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावातील एससी मोटर्स ब्रिज आणि चौकाचे रयत चौक असे नामकरण करण्यात आले. विविध शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी एकत्र येत आज नामफलकाचे अनावरण केले.
राष्ट्रीय महामार्ग-4 अंतर्गत येणार्या बेळगाव-सांबरा रस्त्यावरील एससी मोटर्स पुलाजवळील चौकाचे आज गुरुवारी रयत चौक असे नामकरण करण्यात आले. कर्नाटक राज्य रयत संघ आणि विविध शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी पूजन करून हे नामकरण पार पाडले. यावेळी रयत चौक नावाची पाटी लावण्यात आली. यानिमित्त पुलाला पानांचे तोरण बांधण्यात आले होते हे विशेष. यावेळी शेतकरी नेत्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या दरवाढ धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला. यावेळी बोलताना, कर्नाटक राज्य रयत संघाचे आणि हरित सेनेचे मानद अध्यक्ष शशिकांत पडसलगी म्हणाले, शेतकर्यांच्या लढ्यात हुतात्मा झालेल्या शेतकर्यांच्या स्मरणार्थ आम्ही या चौकात शेतकरी स्मारक नामकरण केले आहे. येथे शेतकर्याचा पुतळा बसवला नाही, तर रयत संघ राज्यभरातून देणग्या जमवून पुतळा उभारू. पूर, बियाणे, खत दरवाढ, शेतकर्यांचे प्रश्न यावरून किंवा शेतकरी शहीद झाल्याने एकाही आमदाराने राजीनामा दिलेला नाही. सत्तेसाठी राजीनामा दिला. 13 जिल्ह्यांतील बुडालेल्या गावांचे स्थलांतर करावे. तसेच राजकारण्यांच्या मालकीच्या कारखान्यांनी शेतकर्यांना ऊसाची थकीत बिले देण्याची मागणी पडसलगी यांनी केली.
यानंतर बोलताना शेतकरी नेते चुन्नप्पा पुजारी म्हणाले, बेळगाव जिल्ह्यात 90% शेतकरी असूनही बेळगावमध्ये शेतकर्याच्या नावाचा एकही चौक नव्हता. आज कर्नाटक राज्य रयत संघटना आणि अन्य सर्व शेतकरी नेत्यांनी एकत्र येऊन गांधी नगर येथील रयत चौकाचे उद्घाटन केले आहे. यावेळी डीसीपी रवींद्र गडाडी यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
Belgaum Varta Belgaum Varta