

बेळगाव : बेळगावची निवड स्मार्ट सिटीमध्ये झाली आहे. एकीकडे शेकडो कोटीच्या अनुदानातून बेळगाव स्मार्ट होत असताना बेळगावच्या प्रवेशद्वारांपासून हाकेच्या अंतरावरील बसस्थानक दयनीय अवस्थेत आहे.
बेळगावमधील सीबीटी बसस्थानकातून बाहेर पडले की पहिला बसथांबा हा आरटीओ सर्कलचे बसस्थानक आहे. बसस्थानकाचे छत पूर्णपणे गंजलेल्या अवस्थेत आहे. आसन व्यवस्था नाही त्यामुळे या मार्गावरुन ये-जा करणार्या प्रवाशांना भर रस्त्यात ट्रॅफिक सिग्नल खाली थांबून बस पकडावी लागते.
हे बसस्थानक जनतेसाठी धोक्याचे बनले आहे. त्यामुळे मोडकळीस आलेले बसस्थानक तात्काळ दुरुस्त करावे अन्यथा हे बसस्थानक हटवावे, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
बेळगांव शहर स्मार्ट होत असल्याची फुशारकी मारणार्या लोकप्रतिनिधींनी स्मार्टसिटी ही केवळ कागदावर नसून प्रत्यक्षात अवतरली पाहिजे याची प्रचिती येईल का? असा सवाल बेळगावातील नागरिक करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta