Monday , September 21 2026
Breaking News

कॅम्प परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येचे निवारण

Spread the love

 

बेळगांव : बुधवार दिनांक 20 जुलै 2022 रोजी बेळगांव उत्तर मतदारसंघातील कॅम्प येेथील रहिवाशांनी आमदार अनिल बेनके यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधुन गेल्या 15 दिवसांपासून पिण्याचे पाणी बंद झाल्याची तक्रार केली. लगद आज दिनांक 21 जुलै 2022 रोजी आमदार अनिल बेनके यांच्या निर्देशनाखाली कॅम्प सीईओ यांच्या कचेरीमध्ये कॅन्टॉन्मेंट बोर्डचे अधिकारी, इंजिनियर, सीईओ, एलअँडटी कंपनी अधिकारी, कॅम्प कॅन्टॉन्मेंट बोर्डचे सदस्य, आमदार अनिल बेनके ऑफिस कर्मचारी तसेच कॅन्टॉन्मेंट परिसरातील रहिवासी यांची बैठक घेण्यात आली.
अगोदर एलअँडटी कंपनी 50 ते 60% पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करत होते, 3 लाख गॅलन पाणी पुरवठा होत होता, 3 दिवसातून एकदा पाणी येत होते. परंतु आता पाणी पुरवठा कमी करण्यात आला आहे. त्यामुळे आज आमदार अनिल बेनके यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे त्यांच्या ऑफिस कर्मचार्‍यांकडून ठरविण्यात आले की, कॅम्प भागात 4 लाख गॅलन पाणी पुरवठा झाला पाहिजेत तसेच पुन्हा 3 दिवसातून एकदा पाणी पुरवठा केला पाहिजेत अशी कडक सुचना देण्यात आली. त्याबरोबर पाणी पुरवठा मेंटेनंन्समध्ये ज्या अडचणी आहेत त्यांची दुरुस्ती करुन घ्यावी अशी कॅन्टॉन्मेंट सीईओ व इंजिनियर यांना कडक सुचना देण्यात आली. यावेळी कॅम्प परिसरातील जनतेने आमदार अनिल बेनके यांना धन्यवाद व्यक्त केले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *