Wednesday , March 4 2026
Breaking News

पोस्टमन विक्रम फडके यांचा निवृत्ती निमित्त सन्मान

Spread the love

 

बेळगाव : गेली 39 वर्षे पोस्ट खात्यात प्रामाणिक आणि तत्पर सेवा बजावलेले शहापूर पोस्ट कार्यालयातील पोस्टमन विक्रम जनार्दन फडके यांचा आज शनिवारी निवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी फडके यांनी बजावलेल्या प्रामाणिक आणि तत्पर सेवेबद्दल त्यांचे कौतुक व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.

शहापूर पोस्ट कार्यालयात पोस्टमास्टर एम. एम. सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला, पोस्ट विभागाचे निरीक्षक महादेव शिरूर, खासबाग विभागाचे नगरसेवक रवी साळुंखे, पी. जी. घाडी, हिरालाल चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. 39 वर्षांच्या पोस्ट सेवेत विक्रम फडके यांनी केवळ दोन दिवस रजा घेतली. कोरोना काळातही त्यांनी कार्यतत्परतेने आपली सेवा बजावली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी विक्रम फडके आणि त्यांच्या पत्नी सौ. वरदा फडके यांचा शाल, पुष्पगुच्छ, पंचफळे, भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी यावेळी फडके यांनी पोस्ट विभागात बजावलेल्या सेवेबद्दल कौतुक व्यक्त करतानाच, त्यांना पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत आणि प्रस्ताविक पोस्टमन आर. व्ही. अंगडी यांनी तर आभार प्रदर्शन पोस्टमन बी. आर. उमदार यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

बोडकेनट्टीत शनिवारी गिरणी कामगारांची बैठक

Spread the love  बेळगाव  : एकेकाळी मुंबईच्या कापड गिरण्यांमध्ये सिमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील हजारो कामगार घाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *