बेळगाव : बेळगावात दैवज्ञ ब्राह्मण समाज शिक्षण संस्थेतर्फे प्रख्यात समाजसेवक, आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ तथा नाना शंकर शेठ यांची 157 वी पुण्यतिथी रविवारी संयुक्त महाराष्ट्र चौकात गांभीर्याने पाळण्यात आली.
बेळगावातील नाना शंकर शेठ मार्ग, खडेबाजार येथील संयुक्त महाराष्ट्र चौकात आज रविवारी प्रख्यात समाजसेवक, आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ तथा नाना शंकर शेठ यांची 157 वी पुण्यतिथी गांभीर्याने पाळण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून नाना शंकर शेठ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी बोलताना जायंट्स ग्रुप ऑफ बेळगावचे माजी अध्यक्ष मदन बामणे म्हणाले, जगन्नाथ तथा नाना शंकर शेठ यांनी आधुनिक मुंबई शहराच्या उभारणीत अमूल्य योगदान दिले आहे. केवळ दैवज्ञ ब्राह्मण समाजच नव्हे तर विविध जाती-धर्माच्या शिक्षण संस्था, उद्योग-व्यवसायांच्या उन्नतीत त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांच्या कार्याचा आदर्श नव्या पिढीनेही घ्यावा यासाठी प्रत्येक शाळा-महाविद्यालयात त्यांच्या कार्याची माहिती देण्याचे उपक्रम सुरु करण्याचे आवाहन त्यांनी दैवज्ञ ब्राह्मण समाज शिक्षण संस्थेला केले.
या प्रसंगी दैवज्ञ ब्राह्मण समाज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विनायक कारेकर, सुवर्णलक्ष्मी सोसायटीचे अध्यक्ष विठ्ठल शिरोडकर, उपाध्यक्ष विजय सांबरेकर, संस्थापक मोहन कारेकर, राजू बेकवाडकर, राजू अर्कसाली, दीपक शिरोडकर, पूजा केसरकर यांच्यासह दैवज्ञ ब्राह्मण समाजाचे नागरिक, खडेबाजार येथील व्यापारी बंधू आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta