बेळगाव : टिळकवाडी विभागात पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत टिळकवाडी येथील सरकारी प्राथमिक शाळा क्रमांक 20, शाळा क्रमांक 36, शाळा क्रमांक 38 व गजानन महाराज नगर प्राथमिक शाळा या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आहाराचे वितरण करण्यात आले. बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी या भागाचे नगरसेवक आनंद चव्हाण, दयानंद हिशोबकर, दौलत शिंदे, वसंत हेब्बाळकर, मंथन चौगुले, अनुप माळी, मोहन चाटे, राजन चव्हाण, उदय मुडलगी, वासुदेव कुलकर्णी, मोहन वाळवेकर, अमित इंचल, आदित्य पन्हाळकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta