बेळगाव : मध्यवर्ती म. ए. समितीच्या वतीने ८ ऑगस्ट रोजी जि. कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठी पत्रकांसाठी हे आंदोलन होणार असल्याने मोठ्या संख्येने या आंदोनात सहभागी होण्याचा निर्धार येळ्ळूरवासियांनी केला.
श्री चांगळेश्वरी मंदिरामध्ये रविवारी रात्री येळ्ळूर विभाग म. ए. समिती येथे बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष शांताराम कुगजी हे होते. प्रारंभी प्रकाश अष्टेकर यांनी उपस्थित आमचे स्वागत करून बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. मराठीत परिपत्रके मिळणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे लोकशाही मार्गाने हा लढा लढण्यात येत आहे. त्यामुळे या लढ्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, युवा आघाडीचे संतोष मंडलिक, शिवाजी सुंठकर, ग्रामपंचायत उपाध्यक्ष लक्ष्मी मासेकर, दत्ता उघाडे, विलास घाडी यांनी विचार मांडले.
यावेळी कार्याध्यक्ष दुधाप्पा बागेवाडी, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, माजी एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील, ग्रामपंचायत सदस्य रमेश मेणसे, दयानंद उघाडे, शिवाजी नांदुरकर, माजी ता. पंचायत सदस्य चांगदेव परीट, शिवाजी पाटील, शिवाजी कदम, जोतिबा चौगुले, राकेश परीट, उदय जाधव, वामन पाटील, वाय. सी. इंगळे, मधु पाटील, परशुराम घाडी, मनीषा घाडी, शालन पाटील, वनिता परीट आदी उपस्थित होते.