बेळगाव : वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत विद्यार्थिनी ठार झाल्याची घटना आज सकाळी भाजी मार्केटजवळ घडली. सादिया पालेगार (वय 16) असे ठार झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आपल्या नातेवाईकाच्या दुचाकीवरून सादिया पालेगार भरतेश स्कूलकडे जात असताना सेठ पेट्रोल पंप जवळ वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली त्यात तिचा जागीच मृत्यू झाला तसेच नातलग किरकोळ जखमी झाला आहे.
अपघातात मयत झालेली सादिया ही भरतेश कॉलेजमध्ये सायन्सच्या पहिल्या वर्षात शिकत असल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी रहदारी उत्तर पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta