बेळगाव : हिंडलगा येथे एक जुन 1986 च्या कन्नड सक्ती विरोधात जे आंदोलन छेडले होते. त्यावेळी पोलिसांच्या बेछूट गोळीबारात ज्यांनी हौतात्म्य पत्करले आहे. त्यांच्या स्मरणार्थ हिंडलगा येथील अकरा गुंठे जागेत महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने स्मारक उभारण्यात आले आहे. त्याच्या बाजूला भव्य भवन बांधण्याचा निर्णय घेतला गेला आहे. शनिवार दिनांक 30 रोजी मराठा मंगल कार्यालयात दि. 8 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवस आंदोलनासंदर्भात बैठक आयोजित केली होती त्या बैठकीवेळी उचगाव येथील म. ए. समितीचे युवा कार्यकर्ते व मार्केट यार्ड मधील अडत व्यापारी माणिक भ. होनगेकर यांनी एक लाख रुपये देणगीचा धनादेश समितीकडे सुपूर्द केला. यावेळी समितीच्या वतीने आभार मानण्यात आले. होनगेकर कुटुंब हे
पुर्वी पासून म. ए. समितीशी एकनिष्ठ आहे. सर्व स्तरातून या निर्णयाचे स्वागत होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta