बेळगाव : श्रीक्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिरामध्ये नागपंचमी निमित्त अष्टकुल नागदेवतेची विशेष पूजा अलंकार अभिषेक करण्यात आले. सकाळी सहा वाजता विशेष रुद्रभिषेक नागमूर्तीला करून दर्शनाची सुविधा करण्यात आली. सकाळपासून मंदिरामध्ये अष्टकुल नागदेवतेच्या दर्शनासाठी लोकांची गर्दी होत आहे.