Saturday , March 7 2026
Breaking News

बसूर्ते गावातील रस्त्यांच्या विकासकामाचे पूजन

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील बसूर्ते गावातील अंतर्गत रस्त्याच्या विकासकामांसाठी 35 लाख रुपये मंजूर झाले असून शुक्रवारी भूमीपूजनाने या रस्त्याच्या कामाला चालना देण्यात आली. ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला आहे.
यावेळी बसूर्ते गावातील पंच मंडळी, एपीएमसी माजी अध्यक्ष युवराज कदम, काँग्रेसचे युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांनी मिळून रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामाला सुरुवात केली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य दत्ता बेनके, सुरज सुतार, विकास होंन्नूरकर, सिद्दनगौड पाटील, किरणगौड पाटील, दीपक गडकरी, मधु जुवेकर, केशव नाईक, लक्ष्मण कुराडे, अजित कुराडे, लक्ष्मण महिकर आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला ३० वर्षांची सक्तमजुरी

Spread the love  बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा पोक्सो न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *