Sunday , July 26 2026
Breaking News

ट्रकची दुचाकीला धडक; तीन जण गंभीर जखमी

Spread the love

 

धडक दिल्यावर ट्रक पलटी

निपाणी (वार्ता) : पुणे-बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाटात भरधाव वेगात येणाऱ्या ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने पुढे जाणाऱ्या दुचाकीला ट्रकने धडक देऊन रस्त्याच्या बाजूला कलंडला. या अपघातात दुचाकीस्वारासह चालक, क्लीनर असे तीन जण गंभीर जखमी झाले. शुक्रवारी (ता. ५) हा अपघात झाला.
बाळकु कोंडीबा खराडे (वय ५३, रा. शिप्पुर, ता. हुक्केरी), संजय चनबसय्या गणाचारी (वय ४८) व क्लीनर अब्दुल मुतालिक शमशुद्दीन बॅडगी (वय ५८, रा. दोघेही हुबळी) अशी गंभीर जखमींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ट्रक चालक संजय आणि क्लिनर अब्दुल हे हुबळी येथून मुंबईकडे तांदळाची पोती घेऊन जात होते. तवंदी घाट उतारावर आले असता ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने शिप्पुर येथून दुचाकीवरून निपाणीकडे जाणाऱ्या खराडे यांना मागून ट्रकने धडक दिली. यावेळी त्यानंतर ट्रक पलटी झाला. यामध्ये बाळकू हे बाजूला फेकले गेल्याने तर संजय व अब्दुल हे वाहनातच अडकून राहिल्याने तिघेही गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती समजाताच रस्ते देखभाल करणाऱ्या जयहिंद कंपनीच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन जखमींना उपचारासाठी तात्काळ येथील महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केले. संजय व अब्दुल यांची प्रकृती गंभीर बनल्याने पुढील उपचारासाठी दोघांनाही बेळगाव येथे हलविण्यात आले. तर दुचाकीस्वार बाळकु यांच्यावर निपाणी येथे उपचार सुरू आहेत. निपाणी पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

कारगिल विजय दिनासह सुगते कुटुंबीयांच्या जन्मदिनी वृक्षारोपण

Spread the love  शहीदांना हरित अभिवादन; भूमी वात्सल्य फाउंडेशनचा पर्यावरणपूरक उपक्रम निपाणी (वार्ता) : कारगिल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *