
बेळगाव : गोल्फ कोर्स परिसरात बिबट्याचा वावर असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गोल्फ कोर्स परिसरातील एक किलोमीटर परिघातील मधील शाळांना सोमवारी सुट्टी देण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री बारा वाजताच्या दरम्यान ट्रॅप कॅमेरा बिबट्याची छायाचित्रे आल्यानंतर वन खात्याने शोध मोहीमेचा केंद्रबिंदू गोल्फ कोर्स परिसर केला आहे.
गोल्फ कोर्स परिसरातील केंद्रीय विद्यालय क्रमांक 2 आणि वनिता विद्यालय, मराठी विद्यानिकेतन, एन पी ई टी क्लब रोड, के एल ई इंटरनॅशनल स्कुल कुवेम्पू नगर, सरकारी प्राथमिक शाळा विश्वेश्वरय्या नगर, सरकारी मराठी शाळा सदाशिवनगर यासह हनुमान नगर, सह्याद्री नगर, कुवेम्पू नगर आणि सदाशिवनगर कन्नड प्राथमिक शाळांना सोमवारी सुट्टी देण्याचा आदेश शहर गटशिक्षणाधिकारी बजंत्री यांनी बजावला आहे.
दरम्यान, हनुमान नगर, जाधव नगर आणि आजूबाजूच्या परिसरांना बिबट्याच्या धोक्याबद्दल सतर्क केले आहे, स्थानिक रहिवाशांना विशेषत: अंधारात आणि पहाटेच्या वेळी विनाकारण फिरू नये असा इशारा दिला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta