बेळगाव (वार्ता) : येथील सरकारी सरदार्स हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ वेणूग्राम यांच्यावतीने राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेची पुस्तके वाटप करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एन. एम. मदनभावी होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष अरविंद खडबडी, रो. सी. एस. व्ही. आचार्य, रो. उमेश रामगुरवाडी, रो. प्रसाद कट्टी होते.
प्रारंभी रणजीत चौगुले यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. एन. एम. मदनभावी यांनी पुष्प देवून पाहुण्यांचे स्वागत केले. राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन उत्तीर्ण व्हावे यासाठी बेंगलोर येथील रोटरी क्लबच्यावतीने अशी खास पुस्तके तयार करण्यात आली असून विद्यार्थ्यांना त्याचे वाटप करण्यात येत आहे त्याचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रसाद कट्टी यांनी केले.
वेणुग्रामचे अध्यक्ष अरविंद खडबडी यांनी कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले होते त्याचा विचार करून इंग्रजी, गणित, विज्ञान या विषयाची पुस्तके तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली बनविण्यात आली असून विद्यार्थ्यांनी आम्ही दिलेल्या पुस्तकाचा वापर केल्यास ते प्रज्ञाशोध परीक्षेत नक्कीच यशस्वी होऊन स्वबळावर पुढील शिक्षण पूर्ण करू शकतील अशी आशा व्यक्त केली. यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी रो. सी. एस. व्ही. आचार्य यांनीही आपल्या शालेय जीवनातील अनुभव सांगून विद्यार्थ्यांनी कष्टाची तयारी ठेवल्यास ध्येय त्यांच्यापासून दूर जाऊ शकत नाही त्यामुळे प्रयत्न करीत राहा असा संदेश दिला. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजीत चौगुले यांनी केले. रवी हलकर्णी यांनी आभार मानले.
Check Also
कर्नाटक कोचिंग सेंटरमधून 50 हून अधिक विद्यार्थ्यांची एसएससी जीडी 2024 परीक्षेमध्ये निवड
Spread the love बेळगाव : विनय ल्हासे सर आणि श्रीशैल तल्लुर सरांच्या मार्गदर्शनाखाली एकाच कोचिंग …