बेळगाव : गेल्या तीन दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे बेळगाव शहर तालुका आणि खानापूर तालुक्यातील प्राथमिक माध्यमिक शाळांना व अंगणवाडी केंद्रांना सुट्टी देण्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. बेळगाव जिल्हा माहिती खात्याला दिलेल्या प्रतिनिधी पत्रकात नितेश पाटील यांनी सोमवारी या शाळांना सुट्टीची घोषणा केली आहे.
तीन दिवसापासून बेळगाव आणि खानापूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बेळगाव तालुका शहरातील खानापूर तालुक्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सोमवारी 8 ऑगस्ट रोजी सुट्टी देण्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, मंगळवारी मोहरमची सुट्टी असल्याने आता विद्यार्थ्यांना बुधवारीच शाळेला लागणार आहे.