
बेळगाव : बेळगावात गेल्या तीन-चार दिवसांपासून पुन्हा मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तशातच घरे कोसळण्याचे सत्र पुन्हा सुरु झाले आहे. भारतनगर तसेच अनगोळ येथील वाडा कंपाऊंड येथील एक दुमजली घर आज सकाळी कोसळल्याची घटना घडली.
गेल्या बेळगाव परिसरात तीन-चार दिवसांपासून पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. लोकांना घराबाहेर पडता येत नाही आणि घरात राहिल्यास घर कधी कोसळेल,अशी भीती आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील विविध भागातील घरांची पडझड झाली आहे. आज सकाळी भारतनगर चौथा क्रॉस येथील विणकर आनंद बिर्जे यांचे घर कोसळले. त्याच्या शेजारी राहणारे पांडूरंग वाईंगडे यांच्या 2 मारूती व्हॅन, 4 दुचाकींचे नुकसान झाले. तर शांता वाईंगडे या किरकोळ जखमी झाल्याचे समजते. तसेच अनगोळमधील वाडा कंपाऊंड येथील अशोक बेंडीगेरी यांचे दुमजली घर पूर्णपणे कोसळले आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
Belgaum Varta Belgaum Varta