Tuesday , March 3 2026
Breaking News

स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत आमदार अनिल बेनके यांच्या कार्यालयात तिरंगा ध्वज वाटप

Spread the love

 

बेळगांव : दिनांक 08 ऑगस्ट 2022 रोजी बेळगांव उत्तर मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके यांच्या कार्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात आयोजित करण्यात येणार्‍या हर घर तिरंगा अभियानाचा एक भाग म्हणून महाशक्ती प्रमुख व नगरसेवकांना तिरंगा ध्वज देण्यात आला.
यावेळी बेळगांव उत्तर मंडळाचे अध्यक्ष श्री. विजय कोडगनूर व सरचिटणीस श्री. विनोद लंगोटी, श्री. अशोक थोराट, हर घर तिरंगा अभियानाच्या उत्तर मंडळाचे श्री. गुरदेव पाटील, श्री. प्रवीण महेंद्रकर, श्री. विक्रम बाळेकुंद्री व युवा मोर्चा महानगर प्रभारी राजन मठपती, युवा मोर्चा राज्य कार्यकारिणी सदस्य सोशल नेटवर्कचे जिल्हा समन्वयक श्री. केदारनाथ जोरापुर, युवा मोर्चा महानगर जिल्हा बेळगांवचे अध्यक्ष श्री. प्रसाद देवरमणी, सोशल नेटवर्कचे उत्तर मंडळाचे समन्वयक श्री. मंजुनाथ भजंत्री, शशिकांत बाडकर, इतर प्रमुख व मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *