बेळगाव : बसवाण गल्ली होसुर येथे राहणाऱ्या निधी कणबरकर हिला एम. कॉम. परीक्षेत राणी चन्नम्मा विश्वविद्यालयात प्रथम क्रमांकासह गोल्ड मेडल मिळाले आहे.
या यशामुळे तिंचे सर्वत्र कौतुक होत आहे. एम. कॉम. प्रथम वर्षात देखील तिने प्रथम क्रमांक मिळवला होता.
निधी ही सुरुवाती पासूनच हुशार विद्यार्थिनी आहे.
गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये पीयुसी द्वितीय वर्षात सहावा क्रमांक प्राप्त केला होता तर बी. कॉम. पदवीधर परीक्षेत जैन कॉलेजमध्ये प्रथम तर आरसीयुमध्ये सहावा क्रमांक मिळाला होता.
भांडी व्यापारी पुंडलिक कणबरकर यांची मुलगी आहे. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी कै. पुंडलिकराव कणबरकर आणि कावेरी कोल्ड्रिंक्सचे मालक नीलकंठ हंडे यांची नात तर कॅपिटल वनचे शिवाजीराव हंडे यांची भाची होय.
Belgaum Varta Belgaum Varta