Monday , September 21 2026
Breaking News

शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार; 18 जणांनी घेतली शपथ

Spread the love

 

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार आज झाला. मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गट व भाजपकडून प्रत्येकी ९ जणांनी कॅबिनेटमंत्री पदाची शपथ घेतली. यामध्ये भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील (शिर्डी), चंद्रकांत पाटील (कोथरूड), सुधीर मुनंगटीवार (बल्लारपूर), विजयकुमार गावीत, गिरीश महाजन, सुरेश खाडे, रवींद्र चव्हाण, अतुल सावे (औरंगाबाद पूर्व), मंगलप्रभात लोढा (मुंबई) यांनी शपथ घेतली. तसेच शिंदे गटाचे संजय राठोड, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील, अब्दूल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई (पाटण) यांनी कॅबिनेटमंत्री पदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळा राजभवन येथे संपन्न झाला.

आज १८ आमदारांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये तानाजी सावंत, दीपक केसरकर या ठाकरे सरकारमधील मंत्र्यांना पुन्हा शिंदे सरकारमध्ये संधी मिळाली आहे. भाजपने मात्र माजी मंत्री आणि ज्येष्ठ आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ घातली आहे. आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे, प्रविण दरेकरांची मात्र मंत्रिपदाची संधी हुकली आहे. प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू आणि शिंदे गटाला समर्थन देणारे अपक्ष आमदार यांनाही मंत्रिपदासाठी थांबावे लागले आहे.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *