बीके कॉलेजची न्याक मूल्यांकन तपासणी यशस्वी : 50 पेक्षा अधिक विभागांना भेटी : परिवर्तनात्मक मार्गदर्शन
बेळगाव : समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे कार्य करत असते. संशोधन हे मानवाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे; तो वेळोवेळी जागरूक ठेवणे महत्त्वाचे आहे. संशोधन वृत्तीमुळे सृजनशीलता वृद्धिंगत होते त्याला पुन्हा प्रेरित करण्यासाठी प्रोत्साहन देणे महत्त्वाचे असून कार्य करण्याची जबाबदारी वाढवली पाहिजेत. वेगवेगळ्या विषयांच्यावर संशोधन करणे उपाययोजना आखणे आणि भविष्यात त्याचा देशाचा विकासाकरिता उपयोग होणे याकरिता कार्य करण्याची जोखीम आजच्या तरुण पिढीकडे आहे हे विसरता कामा नये. शिक्षण आणि समाजामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्यासाठी प्रेरणादायी कार्य आपण करणे अत्यंत गरजेचे आहे आणि ते पुढे यशस्वी नेण्यासाठी विद्यार्थी शिक्षक आणि समाजातल्या सर्व घटकांनी पुढाकार घेऊन सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्न करणे आज काळाची गरज बनली आहे. शिक्षकांनी चांगले संस्कारमय शिक्षण देऊन परिपक्व समाज निर्मितीसाठी प्रयत्न करायला हवे, असे प्रतिपादन जॉन बास्को विश्वविद्यालय कुर्ला मुंबईच्या शिक्षणतज्ञ, संशोधक साहित्यिका प्राचार्या डॉ. पार्वती व्यंकटेश यांनी केले.
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ भाऊराव काकतकर पदवी महाविद्यालय कॅम्प बेळगाव येथे यूजीसीच्या अंतर्गत नियमानुसार न्याक मूल्यांकन शुक्रवार दिनांक 5 ऑगस्ट आणि शनिवार दिनांक 6 ऑगस्ट 2022 रोजी दोन दिवशीय कमिटीने महाविद्यालयाला भेट देऊन सर्व प्रकारचे विविध निकष लावून तपासणी केली.
न्याक मूल्यांकन पीर कमिटीचे अध्यक्ष हैदराबाद क्लस्टर युनिव्हर्सिटीचे कुलगुरू व शिक्षणतज्ञ प्रा. डॉ. साईगोपाल, बी.व्ही.आर, मूल्यांकन समितीचे समन्वयक न्यू दिल्ली जामिया मिलिया इस्लामिया सेंट्रल युनिव्हर्सिटी चे संशोधक ज्येष्ठ अभ्यासक विचारवंत प्रा. डॉ. विश्वजीत दास, जॉन बॉस्को महाविद्यालय कुर्लामुंबई महाराष्ट्र येथील ज्येष्ठ विचारवंत शिक्षण तज्ञ संशोधक साहित्यिका प्राचार्य डॉ. पार्वती व्यंकटेश मूल्यांकन समितीच्या सदस्या म्हणून उपस्थित होत्या.
प्रारंभी महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रवेशद्वारापासून ते महाविद्यालयाच्या ऑफिसपर्यंत विद्यार्थी फलक प्राध्यापक कर्मचारी व्यवस्थापक मंडळीचे पदाधिकारी यांनी साखळी नकाशाचे आयोजन करून टाळ्यांच्या गजरात जल्लोषी स्वागत केले; आणि पुष्पगुच्छ स्मृतिचिन्ह, शाल देऊन मूल्यांकन अधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
व्यासपीठावर डीएमएस मंडळाचे उपाध्यक्ष ॲड. राजाभाऊ पाटील, मंडळाचे सचिव प्रा. विक्रम पाटील, डॉ. दीपक देसाई, नारायण. बी खांडेकर, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आर. वाय. पाटील, सचिव प्रा. सी. वाय. पाटील, कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील, माजी विद्यार्थी संघटनेचे समन्वयक प्रा. डॉ. एम. व्ही. शिंदे, ए. के. जाधव व्यासपीठावर उपस्थित होते.
स्वागत डीएमएस मंडळाचे सचिव प्रा. विक्रम पाटील ,, प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील यांनी केले. तर परिचय आयक्यूइसी (IQEC) समन्वयक प्रा. बी. आय. वसूलकर व प्रा. डॉ. डी. एन. मिसाळे यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. ए. एस. कुलकर्णी व प्रा. नीता पाटील यांनी केले तर प्रा. डॉ. अनिता पाटील यांनी आभार मानले.
यावेळी प्रा. एन. ए. जाधव, प्रा. व्ही. वाय. पाटील, प्रा डॉ. डी. टी. पाटील, प्रा. एस. बी. ताटे, प्रा. डॉ. एम. एस. पाटील, प्रा. अमित चींगळी, प्रा. ए. एस. गोडसे, प्रा. रामभाऊ हुद्दार, प्रा. सुहास बामणे, प्रा. सुरज पाटील, प्रा. निलेश शिंदे, प्रा. अमित सुब्रमण्यम, प्रा. नारायण तोराळकर, प्रा. परशराम बसर्गे, प्रा. एस. एम. चव्हाण, प्रा. दिलीप वाडेकर, प्रा. आनंद पाटील, प्रा. बसवराज कोळूचे, प्रा. अवधूत मानगे, प्रा. प्रभाकर हुरुडे, प्रा. योगेश मुतगेकर, डी.बी.पाटील, अनिल कनबरकर, ए. के. जाधव, ए. व्ही. सुतार, तसेच व्यवस्थापक मंडळाचे पदाधिकारी सदस्य प्राध्यापक विद्यार्थी पालक कर्मचारी हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
————————————
त्यावेळी 50 पेक्षा अधिक विविध विभागांना भेटीगाठी देऊन संवाद साधला
विज्ञान शाखेतील फिजिक्स, बायोलॉजी, झूलॉजी, बॉटनी, केमिस्ट्री, गणित कम्प्युटर , सायन्स , कम्प्युटर लॅब, बायोटेक्नॉलॉजी, वाणिज शाखा, आणि कला शाखेतील मराठी, कन्नड, इंग्रजी, हिंदी, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स, सोशॉलॉजी, ग्रंथालय , क्रीडा विभाग, लेडीज रेस्ट रूम, स्टाफ रूम, तसेच माजी विद्यार्थी संघटना कार्यालय, डीएमएस व्यवस्थापक मंडळ कामकाज कार्यालय, ज्योती करियर अकॅडमी, एनसीसी , एनएसएस, रेड क्रॉस, वायआरसी, स्काऊट गाईड, रोवर रेंजर , जिम व मैदान, जिमखाना, पटांगण, बीके कॉलेजचे कार्यालय, ऑडोटोरीयम, सांस्कृतिक कार्यक्रम व्यासपीठ, सावित्रीबाई फुले मुलींचे वस्तीगृह व राजश्री शाहू महाराज मुलांचे वस्तीगृह पीजी विभाग, माजी विद्यार्थी, पालक , व्यवस्थापक मंडळ, सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थ्यांची गाठीभेटी घेऊन साधकबादक चर्चा करून विकासात्मक संवाद साधला. महाविद्यालयाचा परिसरातील महत्त्वाच्या विकासासाठी विविध मार्गदर्शक करून सूचना केल्या. देशभरातील विविध 20 भाषा विविध कला संस्कृती परंपरा वेशभूषा अशांच्या सांस्कृतिक कार्यक्रमातून मोठ्या थाटात कार्यक्रम संपन्न झाला.
समाप्त
___________________
Belgaum Varta Belgaum Varta