Saturday , April 18 2026
Breaking News

क्रांतिकारकांचे विस्मरण होऊ देऊ नका

Spread the love
प्रा.डॉ. अच्युत माने: दिग्विजय युथ क्लबतर्फे क्रांती दिन
निपाणी (वार्ता) :  स्वातंत्र्यपूर्व चळवळीमध्ये क्रांती दिनाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक क्रांतिकारकांनी ही चळवळ उभी केल्याने सत्ता संपत्ती असलेल्या इंग्रजांना देश सोडून जावे लागले. या चळवळीमध्ये अनेक जणांनी आपले हौतात्म दिले आहे. त्यांच्यामुळेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यामुळे अशा क्रांतिकारकांची विस्मरण होऊ देऊ नका, असे आवाहन प्रा. डॉ. अच्युत माने यांनी केले. येथील दिग्विजय युथ क्लबतर्फे आयोजित २६ व्या क्रांती दिन कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रारंभी दीपक इंगवले यांनी स्वागत केले. उपनगराध्यक्षा नीता बागडे व टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष अभय मानवी यांच्या हस्ते पूजन झाले. नगराध्यक्ष जयवंत भाटले यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
डॉ. माने म्हणाले, क्रांतिकारकांनी अभूतपूर्व लढा दिला आहे. देशपातळीवर झालेली ही क्रांती तरुणांना प्रेरणा देणारी आहे. या पुढील काळातही अन्यायाच्या विरोधात चळवळींचे पुनरुज्जीवन व्हावे.
नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी, आजच्या तरुणांना मार्गदर्शनाची गरज आहे विविध चळवळी व देशसेवेमध्ये युवकांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. अभय मानवी यांनी, संस्कारामुळे समाज टिकून आहे सध्याच्या युवा पिढीला समाज संस्कृती आणि विविध चळवळीची माहिती देण्याची गरज असल्याचे सांगितले. बाबुराव भोपळे यांनी व्यायामाचे महत्त्व स्पष्ट केले. यावेळी माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर प्रा. सुरेश कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास सभापती राजू गुंदेशा, बाबासाहेब कांबळे, सुधाकर माने, श्रीमंत दादाराजे देसाई निपाणकर, प्रणव मानवी, रवींद्र पावले, अशोक राऊत, अनिल संत, नगरसेविका आशा टवळे, सागर मिरजे, विजय टवळे, रजनीकांत बावनकर, प्रसाद औंधकर, प्रशांत केस्ती, तुकाराम कोळी, अभिनंदन कांबळे, सुरेश कुलकर्णी, जनार्दन मोहिते, बापूसाहेब इंगवले, उदय शिंदे, बजरंग तोरस्कर, शिवानंद कदम, इंद्रजीत भोसले,
आनंद संकटात, चंद्रकला संकपाळ, सुलभा रांगोळे, राजश्री चव्हाण, पूनम लाड, वैजयंती बुद्धाचार्य यांच्यासह नागरिक उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

About Belgaum Varta

Check Also

ममदापूर (के. एल.) अंबिकादेवी यात्रेनिमित्त पाच दिवस विविध कार्यक्रमासह शर्यतींचे आयोजन

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर सरकार यांनी स्थापन केलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *