बेळगांव : दिनांक 10 ऑगस्ट 2022 रोजी बेळगांव उत्तर मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके यांनी फोर्ट रोड येथे नाल्यांची तपासणी केली.
पावसामुळे जे नाल्यामध्ये पाणी भरत आहे त्याला जाण्यासाठी वाट करुन दिली पाहिजेत व नाला स्वच्छ केला पाहिजेत. दरवर्षी ज्या समस्या निर्माण होतात त्यावर कायमस्वरुपी उपाय करावा असा संबंधित अधिकार्यांना आमदार अनिल बेनके यांनी आदेश दिला.
यावेळी आमदार अनिल बेनके यांच्या समवेत संबंधित अधिकारी व इतर उपस्थित होते.