बेळगाव : बेळगावात दिसलेला बिबट्या अद्याप सापडला नसल्याने शुक्रवारी दि. 12 रोजी पुन्हा “त्या” 22 शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
डीडीपीआय बसवराज नलतवाड आणि बीईओ रवी बजंत्री यांनी सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात आदेश जारी केला आहे.
बेळगाव शहर आणि ग्रामीण शैक्षणिक क्षेत्रांतर्गत येणाऱ्या शाळांना शुक्रवारी (१२ ऑगस्ट) सुट्टी वाढवण्यात आली आहे, अशी माहिती डीडीपीआय बसवराज नलतवाड यांनी दिली आहे.
या भागातील मुलांना विविध शाळांमध्ये पाठवताना पालकांनी दक्षता घ्यावी, असे ते म्हणाले.
Belgaum Varta Belgaum Varta