
बेळगाव : भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बेळगाव शहरात विविध ठिकाणी विमल फौंडेशन आणि भाजपा नेते किरण जाधव यांच्यावतीने जनजागृती व ध्वज वितरण करण्यात आले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तसेच स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणार्या लाखो स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करण्यासाठी ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमातंर्गत 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत एकत्र येऊन आपला राष्ट्रध्वज आपल्या घरोघरी फडकावू या उद्देशाने विमल फौंडेशन आणि भाजपा नेते किरण जाधव यांच्यावतीने जनजागृती मोहीम आणि ध्वज वितरणाची सुरुवात कॅम्प आणि बेळगाव शहर, गँगवाडी, वड्डरवाडी, गुडशेड रोड, शास्त्रीनगर, वडगाव येथे करण्यात आली. सुमारे 2500 ध्वजांचे वाटप करण्यात येणार आहे.
यावेळी श्री. राजन जाधव, श्री. हणमंत कागलकर, शिव मलकन्नावर, अक्षय साळवी, अभिषेक वेर्णेकर, चेतन नंदगडकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta