
बेळगाव : शासनाच्या आदेशानुसार यावर्षी हर घर तिरंगा अभियान सुरू करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार शनिवारी या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. येळ्ळूर येथील शिवाजी विद्यालय येथे स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाला येळ्ळूर ग्रा. पं. अक्ष्यक्ष सतीश बा. पाटील हे प्रमूख पाहूणे म्हणून उपस्थित होते. सुरुवातीला ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर प्रमोद पाटील यांनी पूजन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मनोहर बाचीकर, शिक्षक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र येळ्ळूर येथेही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमत्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ग्रा. पं. अध्यक्ष सतीश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बोलतांना येळ्ळूर ग्रा. पं. अध्यक्ष सतीश पाटील यांनी राष्ट्र ध्वजाचा कोणत्याही प्रकारे अवमान होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन केले. तसेच अनावधानाने चुकून कुठेही कोणाकडून ध्वजाचा अवमान होत असल्यास, तिथेच त्या व्यक्तीला योग्य मार्गदर्शन करून, राष्ट्रध्वजाचे पावित्र्य राखले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. रमेश दंडगी, परिचारिका तसेच कर्मचारी आणि आशा कार्यकर्त्या तसेच येळ्ळूर ग्रा. पं. अध्यक्ष सतीश पाटील आणि ग्रा. पं. सदस्य प्रमोद पाटील, शिवजी नांदुरकर, रमेश मेणसे, शशीकांत धुळजी, अरविंद पाटील, कल्लाप्पा मेलगे, शांता काकतकर, लक्ष्मी कणबरकर, शांता मासेकार तसेच गावातील इतर नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta