Tuesday , March 3 2026
Breaking News

गणेशपूर येथील संतमीरा इंग्रजी स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा

Spread the love

बेळगाव (प्रतिनिधी) : संतमीरा इंग्लिश मेडीयम स्कूलतर्फे स्वातंत्र दिन उत्साहात संत मीरा इंग्लिश मीडियम स्कूल गणेशपुर हिंडलगा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रमुख पाहुणे म्हणून मधुकर गुर्लहोसूर हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
यावेळी रामनाथ नाईक यांनी स्वातंत्र्याबद्दल आपले विचार व्यक्त केले. यावेळी नर्सरी ते सहावीच्या वर्गांना विविध क्षेत्रातील मान्यवरांची नावे देण्यात आली व त्यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली.
यावेळी शाळा सुधारणा समितीचे सदस्य देवीप्रसाद कुलकर्णी, रामनाथ नाईक, महेश नरगुंदकर, मनस्वी नरगुंदकर, शोनाया नरगुंदकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. आरती पाटील व सर्व शिक्षक वर्ग, शाळेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *