Wednesday , March 4 2026
Breaking News

पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला

Spread the love

बेळगाव : शहापूर येथील पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयात आजादी का अमृत महोत्सव स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. मयूर नागेनहट्टी यांनी केले. प्रमुख पाहुणे व विश्व भारत सेवा समिती संस्थेचे सचिव प्रकाश नंदिहळी यांच्या हस्ते फोटो पूजन करण्यात आले. ध्वजारोहण प्रा. व्हाय. टी. मुचंडी सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, झेंडावंदन, झेंडागीत सादर केले. स्वातंत्र्याच्या आजादी का अमृत महोत्सवच्या निमित्त विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयात वर्ग सजावट, भाषण स्पर्धा, गायन स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला प्राचार्या ममता पवार, सचिव प्रकाश नंदिहळी, शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन आरती गोरल यांनी केले. व कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमनी झाली.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *