
बेळगाव : टिळकवाडी शांतीनगर येथील आदिशक्ती महिला सेवा संघातर्फे मंगळागौरी कार्यक्रम उत्साहात पार पडला.
श्रावण महिन्यात महिला वर्ग विविध सणवार साजरे करण्यात गुंतलेल्या असतात. आदिशक्ती महिला सेवा संघातर्फे महिलांनी मंगळागौरी साजरी केली. यामध्ये मंगळागौरीचे विविध पारंपरिक झिम्मा-फुगडी घालत, आगोटा, उखाणे आदी खेळ खेळत महिलांनी हिंदू संस्कृतीची जपणूक केली.
या कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत स्मिता शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्या पाटील यांनी केले.
यावेळी सुमन दळवी, प्रतिभा जुवेकर, विद्या पाटील, कांचन बनस्कर, मयुरी राजाई, सविता खरे, श्वेता खांडेकर, स्मिता शिंदे, नंदिनी पाटील, सुरेखा काळे, सुमेधा काळे, वीणा मनोळकर, उषा दळवी, मंजुळा बालिकट्टी, मंगल नावले, संजीवनी हिरेमठ, ज्युलियन, अन्नपूर्णा पाटणकर, पौर्णिमा मोहिते, सोनाली कुलकर्णी, कोमल कार्वेकर आदी महिला उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta