बेळगाव : गुरुवार दिनांक 18 ऑगस्ट 2022 रोजी बेळगांव उत्तर मतदार संघाचे आमदार अनिल बेनके यांनी भाजपच्या संसदीय मंडळाच्या सदस्यपदी निवड झालेले माजी मुख्यमंत्री श्री. बी. एस. येडियुराप्पा यांची आज कावेरी निवासस्थानी भेट घेवून अभिनंदन करुन आशिर्वाद घेतला.
यावेळी आमदार अनिल बेनके म्हणाले की, आज निकटपुर्व मुख्यमंत्री, कर्नाटकाचे लाडके नेते, शेतकरी नेते, भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ कार्यकर्ते व माझे राजकीय गुरु श्री. बी. एस. येडियुरप्पाजी यांच्या निवासस्थानी भेट देवून भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाच्या सदस्यपदी नियुक्तीबद्दल त्यांच्या नविन जबाबदारीसाठी त्यांना शुभेच्छा देवून आशिर्वाद घेतला.
Belgaum Varta Belgaum Varta