Tuesday , March 3 2026
Breaking News

चंदरगी येथे कबड्डी स्पर्धेदरम्यान दोन गटात हाणामारी

Spread the love

 

बेळगाव : कबड्डी स्पर्धेदरम्यान दोन शाळांमध्ये हाणामारी झाल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील चंदरगी येथील शाळेच्या आवारात घडली.

कबड्डी स्पर्धेदरम्यान क्षुल्लक कारणावरून तरुणांच्या दोन गटात हाणामारी सुरू झाली. स्वरकांगी शाळेच्या प्रांगणात आज चंदरगी शाळा आणि कटकोळ शाळा यांच्यात कबड्डीचा अंतिम सामना आयोजित करण्यात आला होता. स्पर्धेदरम्यान मैदानावरच तरुणांमध्ये वाद सुरू झाला.
दोन्ही संघातील खेळाडूंनी सामना अर्धवट सोडून लाठ्या-काठ्या घेऊन मारामारी करण्यास सुरुवात केली. यावेळी स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्यांवरही दगडफेक करण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *