बेळगाव : सर्व सरकारी परिपत्रके, कागदपत्रे मराठी भाषेमध्ये देण्याची मागणी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडीच्या वतीने रोजी बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीकडे करण्यात आली आहे.
यासंदर्भात युवा आघाडीतर्फे ग्रा. पं. ला निवेदन देण्यात आले. म. ए. समिती युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलीक, दत्ता उघाडे, महेश जुवेकर, आंबेवाडी ग्रा. पं. अध्यक्ष चेतन पाटील, बेळगुंदी ग्रा. पं. सदस्य राजू बोकडे, मदन पाटील, कांतेश चलवेटकर, निलेश सहित युवा आघाडीचे कार्यकर्ते तसेच ग्रा. पं. सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी दत्ता उघाडे, बाळासाहेब चोपडे, डॉ. राजू पाटील, दत्ता उघाडे, कल्लाप्पा देसुरकर, मोनेश्वर गरग यांनी मराठी माणसावर कसा अन्याय होत आहे याबद्दल माहिती दिली.
यावेळी बेनकनहळ्ळी ग्रामपंचायत अध्यक्षा प्रेमा रमेश हिरोजी, मौनेश्वर गरग, गणेश सुतार, उमेश चोपडे, कलावती देसुरकर, संदीप डवाळे, शिल्पा मुंगळीकर, भरमा कोलकार, महेश कोलकार, मिनाक्षी पाटील, मल्लापा पाटील, डॉ. यल्लप्पा पाटील, कलाप्पा देसुरकर, कलाप्पा पाटील, पप्पू भोसले, जोतीबा देसूरकर, बाळासाहेब चोपडे, डॉ. राजू पाटील, लक्ष्मण खांडेकर, मारूती पाटील, निंगाप्पा देसूरकर, मोहन कांबळे, मारुती पुन्नाप्पा पाटील, शंकर पाटील, परशराम पाटील, विठ्ठल पाटील, युवराज पाटील, बाबाजी देसूरकर, प्रभाकर देसूरकर, बाळू मुंगळीकर, देवाप्पा काटकर, नागेश देसुरकर, योगेश पाटील, उमेश पाटील, किरण पाटील, परशराम भु. पाटील, जोतिबा पिसाळे, मनोहर पिसाळे, प्रमोद लाड, आनंद पाटील, निलेश पाटील, रमेश हिरोजी, रोहित देसूरकर, मलाप्पा देसूरकर आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta