Monday , April 20 2026
Breaking News

सौंदलगा येथे राष्ट्रीय महामार्ग शेजारी पाणी पिण्याच्या बहाण्याने बकर्‍यांची चोरी

Spread the love

 

सौंदलगा : येथील राष्ट्रीय महामार्गा शेजारी असलेल्या शिगावे मळ्यातील युवराज सिध्दगोंडा शिगावे यांच्या चरण्यासाठी सोडलेल्या दोन शेळ्या व एक पालवे यांची दिवसा चोरी करण्यात आली.
राष्ट्रीय महामार्गा शेजारी शिगावे मळा असून शिगावे यांचे घर ही तेथेच आहे. सकाळी साडे अकराच्या दरम्यान आपल्या म्हैशी व शेळ्या चरण्यासाठी सोडल्या होत्या. त्यावेळी इनोव्हा सारखी असणारी गाडी रस्त्यावर उभी केली होती. त्या गाडीतील एक इसम (कमीत-कमी वय 30 ते 35) पाणी मागण्यासाठी आला. त्यावेळी युवराज शिगावे यांच्या आईने आपल्या घराशेजारील टाकीतील पाणी घेण्यास सांगितले. यावेळी टाकीतील पाणी घेऊन त्याने गाडीकडे येण्यास निघाला. त्यावेळी युवराज यांची आई घराकडे आली व त्यांनी त्या इसमाला कोणत्या गावचे असे विचारले असता त्यांच्या घराशेजारी जे काम चालू आहे. त्यावरती देखरेख करण्यासाठी आपण येथे थांबलो आहे असे सांगितले. त्या वेळेचा फायदा घेऊन शेळ्या ओरडू नयेत म्हणून त्यांना मक्का खायला घालत आपल्या गाडीत घातले. दोन शेळ्या, एक पालवे यांची चोरी पाच मिनिटात करून त्याने गाडीतून पळ काढला. यावेळी आपल्या शेळ्या नाहीत हे शिगावे यांच्या लक्षात आले. तोपर्यंत गाडी निघून गेली होती. आपल्या शेळ्या चोरीस गेल्या हे लक्षात आले.
यासंदर्भात युवराज शिगावे यांनी सांगितले की, दोन मोठ्या शेळ्या होत्या, एक पालवे होते. (सर्वसाधारण पन्नास हजार किंमत होत होती) त्याठिकाणी गाडीची नागरिकांना चौकशी केली असता. तेथील नागरिकांनी सांगितले की गाडी निपाणीच्या दिशेने गेल्याचे समजते. यांची आज चोरी झाली असून आपण निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये याची नोंद केली आहे. अशाप्रकारे दिवसा चोरी झाल्यामुळे सौंदलगा परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

About Belgaum Varta

Check Also

मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे रविवारी (ता.१९) शिवजयंती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *