बेळगाव : जात-धर्म अनेक असले तरी ईश्वर एकच आहे अशी भावना जपत एका मुस्लिम कुटुंबाने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आपल्या घरातील चिमुकल्याला भगवान श्रीकृष्णासारखे सजवून कृष्ण जन्माष्टमी साजरी केली.
बेळगावातील सदाशिव नगर आज या एका अद्भुत घटनेचे साक्षीदार बनले. सदाशिव नगरातील दस्तगीर मोकाशी या मुस्लीम कुटुंबाने हिंदू-मुस्लिम असा भेदभाव न करता कृष्ण जन्माष्टमीनिमित्त आपल्या चिमुकल्या अदनानला भगवान श्रीकृष्णाची वेशभूषा करून जातीय सौहार्दाचा संदेश दिला आहे. आपल्या छोट्या गोड बाळाला बाळकृष्णासारखे सजवून, त्याच्या हाती बासरी देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता या खोडकर बाळकृष्णाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
या संदर्भात बोलताना मोकाशी यांनी सांगितले की, गोकुळाष्टमीच्या निमित्ताने आम्ही आमच्या घरातील मुलाला अशा प्रकारे सजवले आहे. आम्ही कसलाही भेदभाव न करता, एकसमान भावनेने हा कार्यक्रम सर्व हिंदू आणि मुस्लिम मिळून हा सण साजरा केला. शाळेत शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही घरी आमच्या मुलाला श्रीकृष्णाच्या अवतारात सजवून तयार केले. आम्ही सर्व हिंदू मुस्लिम सण उत्साहाने साजरे करतो. आमच्यात फूट पाडणारी भावना नाही, असा ऐक्याचा संदेश त्यांनी दिला.
Belgaum Varta Belgaum Varta