बेळगाव : हरियाणा येथे २४ ते २७ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या फेडरेशन चषक – हरियाणा रोटक २०२२ या ५४ किलो गटातील कुस्ती स्पर्धेत सहभागी होणार्या हलगा बस्तवाड गावातील लक्ष्मी संजय पाटील हिचे बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मीबाई हेब्बाळकर यांनी अभिनंदन केले.
लक्ष्मीच्या धाडसाचे आणि शौर्याचे कौतुक करून आमदार हेब्बाळकर यांनी तिला शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील या मुलीने राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपली क्रीडा स्फूर्ती दाखवून राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे ही बेळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्या म्हणाल्या.
यावेळी लक्ष्मी पाटील यांचे कुटुंबीय व ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta