Wednesday , March 4 2026
Breaking News

बेळगावातील सार्वजनिक गणेश मंडपात वीर सावरकरांचे भावचित्र लावावेत : आमदारांची सूचना

Spread the love

 

बेळगाव : काँग्रेसने सावरकरांची प्रतिमा लावण्यास विरोध दर्शविल्यानंतर भाजप आता गणेशोत्सवात सावरकरांचे भावचित्र लावण्यास पुढे सरसावला आहे.
बेळगावातही सावरकरांचे चित्र लावण्याचा मुद्दा सध्या गाजत आहे. काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवादरम्यान सर्व गणेश मंडळांमध्ये सावरकरांची प्रतिमा लावण्याचा निर्धार करण्यात आला आहे. याच मुद्द्यावर बेळगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार अभय यांनी गणेशोत्सवादरम्यान सावरकरांचे भावचित्र लावण्याबाबत विचारलेल्या माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर दिले. हा मुद्दा संबंधित गणेशोत्सव मंडळांचा आहे. सावरकरांचे छायाचित्र लावणाऱ्या सर्व गणेश मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. बेळगावात ते रोखण्याची ताकद कोणाचीच नाही. कोणी विरोधात आल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, गणेशोत्सवासाठी बेळगावात केलेल्या तयारीबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, गणेशोत्सवापर्यंत प्रतीक्षा करा, आताच काही सांगणे चुकीचे ठरेल. या आधीच काही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला फोन करून सार्वजनिक गणेशोत्सवात सावरकरांचे छायाचित्र लावणार असल्याचे सांगितले आहे. सावरकर हे संपूर्ण देशाचे मार्गदर्शक होते. गणेश मंडपात त्यांचा फोटो लावणार असतील त्यांनी जरूर लावावा असे आ. अभय पाटील यांनी सांगितले. त्याचवेळी, त्यांनी देशाला सावरकरांच्या योगदानासंदर्भात विरोधी पक्षांनी केलेल्या टीकेला कडक उत्तर दिले. विरोधी पक्षांना किती ज्ञान आहे याचा पुन्हा एकदा अनुभव आला आहे. उपलब्ध कागदपत्रे तपासा. सावरकरांसारखी कठोर शिक्षा देशातील कोणत्याही स्वातंत्र्यसैनिकाला झाली नाही. विरोधकांनी ते अभ्यासावे, असे आ. अभय पाटील यांनी ठणकावले. दरम्यान, बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके, यांनीही याच मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, बेळगावच्या प्रत्येक गल्ली-बोळात सावरकरांचे चित्र आहे जेथे गणेश विराजमान आहे. यावर आधीच चर्चा झाली आहे. सावरकर यांना बेळगावच्या हिंडलगा कारागृहात ब्रिटिशांनी ठेवले होते. तुरुंगात त्याचा फोटो लावला आहे. म्हणून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांचा फोटो लावणे अनिवार्य आहे. सावरकरांचे छायाचित्र लावण्यास सर्व मंडळांना प्रवृत्त केले जाईल. आम्ही स्वतः त्यांना सावरकरांचे चित्र देऊ. यात शंका नाही. सावरकरांचे स्मरण हे आपले कर्तव्य आहे, असे ते म्हणाले. यावेळी, त्यांनी सावरकरांवर विरोधकांच्या टीकेबद्दल माध्यमांच्या एका प्रश्नाला उत्तर दिले की, सावरकर तुरुंगात होते. त्यांना काळ्यापाण्याची कठोर शिक्षा झाली. आपले तारुण्य त्यांनी देशासाठी तुरुंगात घालवले. विरोधी पक्षांना याबाबत काहीच माहिती नाही. विरोधी पक्षाला सावरकरांबद्दल काय माहिती आहे, असा सवाल त्यांनी केला. सावरकरांनी आपल्या लेखणीतून देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीव ओतला होता असे ते म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

बोडकेनट्टीत शनिवारी गिरणी कामगारांची बैठक

Spread the love  बेळगाव  : एकेकाळी मुंबईच्या कापड गिरण्यांमध्ये सिमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील हजारो कामगार घाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *