बेळगाव : सोमवार दिनांक 22 ऑगस्ट 2022 रोजी फुलबाग गल्ली येथे समाज प्रमुखांसमवेत बेळगांव उत्तर मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके यांनी बैठक घेतली.
बेळगांव उत्तर भागातील चालु असलेली विविध विकासकामे तसेच आगामी विकासकामांबद्दल आमदार अनिल बेनके यांनी समाज प्रमुखांची बैठक घेतली आणि समाजप्रमुखांच्या मागणीनुसार बेळगांवमध्ये लवकरच हायटेक गो-शाळा बांधण्यात येणार आहे असे आमदारांनी सांगितले.
यावेळी श्री. बालाजी ठक्कर, श्री. रोहित रावळ, श्री. रमेश भंडारी, श्री. विजु पोरवाल, श्री. मंगलजी चौधरी, श्री. महेश पोरवाल, श्री. संजु अगरवाल, श्री. गेलाराम प्रजापती, श्री. विजय जाधव व सर्व 36 समाज प्रमुख उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta