Saturday , November 7 2026
Breaking News

पंत बाळेकुंद्री खुर्द गावच्या विकासकामासंबंधीचा धनादेश सुपूर्द

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील पंत बाळेकुंद्री खुर्द गावाला आमदार निधी तसेच विधान परिषद निधीतून असे दुप्पट अनुदान मिळाले.
आम. लक्ष्मी हेब्बाळकर यांचे आमदार निधीतून 7 लाख रूपये मंदिराच्या कम्युनिटी हॉलच्या बांधकामासोबतच चन्नराज हट्टीहोळी यांच्या विधान परिषद निधीतूनही 5 लाखाच्या निधीतून शाळेची खोली बांधण्यात येणार आहे.
चन्नराज हट्टीहोळी यांनी सोमवारी शासकीय उर्दू प्राथमिक शाळेच्या अतिरिक्त खोल्या बांधण्यासाठी पाच लाख रुपये मंजूर केल्यानंतर कामाचा शुभारंभ केला.
आमदार निधीतून श्री दुर्गादेवी मंदिराच्या नवीन कम्युनिटी हॉलच्या बांधकामासाठी 7 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून, त्याचा पहिला हप्ता यापूर्वीच वितरित करण्यात आला असून, आज चन्नराज हट्टीहोळी यांनी मंदिर समितीला धनादेश सुपूर्द केला.
श्रावण सोमवारनिमित्त श्री रामलिंगेश्वर मंदिरात आयोजित महाप्रसादाचे आयोजनही हट्टीहोळी यांनी केले.
यावेळी गावातील प्रेमा कोलकार, दत्तू कोलकार, सुरेश तलवार, उमाजीराव जाधव, प्रकाश कोलकार, मैनुद्दिना आगसिमनी, नूर मुल्ला, अप्सर जमादार, नजीरा जमादार, अल्ताफ यादव, युनुफ जमादार, जानूल मकानदार, सिकंदर अगसीमनी आदी उपस्थित होते.
होनगौडा पाटील, सुरेश काळोजी, विनयगौडा पाटील, रमणगौडा पाटील, परळू पाटील, मंदिर समिती सदस्य, उर्दू शाळेचे कर्मचारी, ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *