Saturday , October 19 2024
Breaking News

हिरेबागेवाडी पोलिसांकडून दरोडेखोरांना अटक

Spread the love

बेळगाव : निवृत्त वनअधिकाऱ्यांचे भर रस्त्यात अपहरण करून 20 लाख रुपयांची मागणी करणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला हिरेबागेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबतची माहिती अशी की, 31 जुलै रोजी सेवानिवृत्त वनअधिक्षक धारवाड येथे जात असताना पाच दरोडेखोरांनी स्कॉर्पिओ गाडी अडवून सुमारे 4 लाखाचा ऐवज लुटला तसेच निवृत्त अधिकाऱ्याचे अपहरण करून 20 लाख रुपयांची मागणी देखील करण्यात आली होती. याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होती.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत बेळगाव ग्रामीण उपविभागाचे एसीपी एस. व्ही. गिरीश यांच्या मार्गदर्शनाखाली हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे पीएसआय विजयकुमार एन. सिन्नूर व कर्मचाऱ्यांनी या दरोडेखोरांना जेरबंद करण्यात यश मिळविले आहे.
बेळगाव शिवाजी नगर येथील लगमप्पा मल्लाप्पा कोल्लनायक (30), प्रकाश गुजाप्पा गुरव (26) रा. दुर्गामा गल्ली मुत्यानहट्टी, कल्लाप्पा सिद्राय होनंगी (29) मुत्यानहट्टी, मारुती हणमंत नागाप्पा बुद्रानी (20) रा. मास्तमर्डी, विठ्ठल पवार, सिद्राय तळवार अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

अटक करण्यात आलेल्यांकडून 3 लाख 80 हजारांची रोकड, स्कॉर्पिओ, प्लास्टिकचे डमी पिस्तुल, तलवार, लोखंडी रॉड असा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.

पीआय विजयकुमार एन. सिन्नूर, पीएसआय प्रवीण बिरादार, पीएसआय अभिषेक नाडगौडर, कर्मचारी ए. के. कांबळे, एम. ए. मंटूर, आर. एस. केळगीनमनी, एस. जी. उप्परट्टी, एस. सी. चिन्ननावर, संतोष जगजंपी आणि रमेश अक्की यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *