बेळगाव (प्रतिनिधी) : कल्लेहोळ गावाकडे जाणाऱ्या वेशीवरच्या रस्त्याची गेल्या वर्षभरापासून अतिशय दुर्दशा झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत या रस्त्याने पायी चालणेसुद्धा कठीण झाले हाेते. असे असताना ग्रामपंचायतने मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीकडे कानाडाेळाच करीत हाेते. अखेर गावातील सामाजिक कार्यकर्ते व तरुणांनी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पुढाकार घेतला. तरुणांनी श्रमदान करीत रस्त्याची दुरुस्ती आणि साफसफाई करून हा रस्ता रहदारी याेग्य केला. तरुणांच्या या उपक्रमाचे अनेकांनी काैतुक केले.
कल्लेहोळ गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने व पावसाळ्यात रस्त्यावर चिखल झाला होता. त्यामुळे अनेक वेळा दुचाकी घसरून लहान सहन अपघात घडत होतं होते. ही बाब लक्षात घेत गावातील सामाजिक कार्यकर्ते नारायण राक्षे, जोतिबा कडेमनी, सुरेश नागोजीचे, शिवाजी पाटील सहकारी तरुणांनी श्रमदान करीत मुरूम टाकून रस्त्याची दुरुस्ती केली. हा रस्ता रहदारीयाेग्य झाल्याने महिला व नागरिकांना माेठा दिलासा मिळाला आहे.